तरंग, लहरी आणि बले यांचे मानवी शरीर आणि मन यावरील परिणाम The effects of waves and forces on the human body and mind
तरंग, लहरी आणि बले यांचे मानवी शरीर आणि मन यावरील परिणाम
The effects of waves and forces on the human body and mind
पृथ्वी हा ग्रह वैशिष्ट्यपूर्ण असा असून, तो सजीवसृष्टी असलेला या विश्वातील ज्ञात असलेला एकमेव ग्रह आहे. या ग्रहावर वास्तव्य करीत असलेल्या अनेक सजीवांपैकी मानव हा एक सजीव प्राणी आहे. मात्र इतर सजीवांशी तुलना करता, मानवाचे हे वास्तव्य मागील बारा हजार वर्षात पृथ्वी ग्रहावर कमालीचे ठळकपणे समोर आले आहे. तसेच मागील काही शतकात तो या पृथ्वी ग्रहाचा अनभिक्षित सम्राट बनला असून, पंच महाभूते यांच्यावर प्रभुत्व गाजविण्यासाठीची त्याची धडपड निरंतर चालू असते. अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या सृष्टीत अनेक जैविक आणि अजैवीक घटकांचा समावेश होतो. पृथ्वीच्या वातावरणात अनेक प्रकारचे बले, किरणे, तरंग आणि लहरी अस्तित्वात आहेत. साहजिकच ही बले, किरणे, तरंग आणि लहरी ह्या मानवी शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर अनेक प्रकारचे प्रभाव आणि परिणाम साधत असतात. ही बले, किरणे, तरंग आणि लहरी ह्या कोणत्या आहेत, त्या कशा निर्माण होतात, त्यांची वैशिष्टे काय आहेत , त्या कशा प्रभाव आणि परिणाम साधतात, आणि त्यांचा प्रभाव आणि परिणाम कसा कमी -जास्त करता येईल, याबाबतचे विवेचन आपण प्रस्तुत लेखात करणार आहोत.
पृथ्वी ग्रह आणि त्याचे भोवती असणारे वातावरणीय कवच यात अनेक प्रकारचे बल, किरण लहरी आणि तरंग अस्तित्वात असतात. यामधील प्रथमत: किरणांबाबत माहिती घ्यायची झाल्यास विश्वात प्रकाशाचे एकूण आठ प्रकारचे किरण असतात. त्यांना आपण रे म्हणतो. या सर्व किरणांना वेगवेगळ्या प्रकारची तरंगलांबी आणि वारंवारता असते. त्या आधारे या किरणांचे वर्गीकरण होते. तरंगलांबी म्हणजे काय तर तरंगाच्या एका शिखरा पासून दुसर्या शिखरा पर्यंत अंतर होय. वारंवारता म्हणजे एका विशिष्ट वेळेत निर्माण होणारे तरंग. तरंगलांबी कमी असली की वारंवारता वाढते. वारंवारता वाढली की ऊर्जा जास्त निर्माण होते. या विविध किरणां मद्धे गॅमा किरण, अल्फा कण, बिटा किरण, क्ष किरण ,अल्ट्राव्हायोलेट किरण, दृश्य किरण, अवरक्त किरण, मायक्रो वेह्व/लहरी, रेडीओ लहरी यांचा समावेश होतो. या प्रत्येक किरणांची एक ठराविक तरंगलांबी आणि वारंवारता असते. हे सर्व किरण हे विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम आणि उर्जेचा मोठा स्रोत आहेत. या किरणांचे चांगले-वाईट परिणाम वातावरणात आणि आपल्या शरीरावर होत असतात. तसेच ते काही प्रमाणात मानसिक अवस्था, मानसिक संतुलन, मानवी स्वभाव आणि मानवी वर्तन यावर प्रभाव टाकत असतात.
किरणोस्तारी मूलद्रव्यामधून तीन किरणे बाहेर पडतात त्यांना गॅमा, अल्फा आणि बिटा असे म्हणतात. ही किरणे तयार होण्यामागे अस्थिर अणू हा स्थिर होण्यासाठी धडपड करतो हे कारण असते. गॅमा किरण हे विद्युत चुंबकीय किरण असून तो किरणोस्तारी मूलद्रव्यामधून मधून तयार होतात. गॅमा किरण हे सूक्ष्म तरंग लांबी असलेले आणि मोठी ऊर्जा करणारे असतात. गॅमा किरण हे धन प्रभारीत असतात. त्यांना फोटॉन असेही म्हटले जाते. हे गॅमा किरण कोठेही प्रवेश करू शकतात तसेच त्यांची आयनिभवन शक्ति खूप मोठी असते. गॅमा किरण हे जीवंत पेशीत शोषले जात असल्याने ते धोकादायक ठरतात.
अल्फा किरण हे हेलियम सदृश्य किरण असतात, ते सुद्धा धोकादायक किरण आहेत. अल्फा कण म्हणजे हेलियम अणुचा केंद्रक असतो. हा कण दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन्स मिळून बनलेला असतो. अशा अनेक कणांनी मिळून अल्फा किरण बनतो. बिटा किरण हे इलेक्ट्रोन्स असतात आणि हे किरण ऋण विद्युतभारित असतात. साहजिकच अल्फा, बिटा आणि गॅमा या किरणाच्या संपर्कात आपण आल्यास त्यातून आपल्याला धोका संभवतो.
क्ष किरण ज्याला आपण एक्स रे म्हणतो. असे क्ष किरण हे अदृश्य असतात, ते एका सरळ रेषेत प्रवास करतात, ते ऋण प्रभारीत असतात आणि ते वस्तूला भेदून आरपार जावू शकतात. क्ष-किरणचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. जास्त वेळ क्ष-किरणाच्या संपर्कात आल्यास कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होतो.
अल्ट्राव्हायोलेट किरण यांना अतिनील किरणे असेही म्हटले जाते. त्याची निर्मिती सूर्यापासून होते. यांची तरंगलांबी ही दृश्य किरणा पेक्षा कमी असते. तीव्र स्वरूपाची अतिनील किरणे त्वचाविकार करू शकतात. निर्जुंतीकरण प्रक्रियेत हे किरण वापरतात.
दृश्य किरण हे आपण जे सूर्याचे किरण पाहतो. साहजिकच सूर्याने निर्माण केलेल्या उर्जेतून हे निर्माण होतात. हे किरण आपल्या डोळ्यांना दिसतात म्हणून त्यांना दृश्य किरण म्हणतात. या किरणांची तरंगलांबी ३८० ते ७५० नॅनोमीटर असते.
अवरक्त किरण किंवा आपण ज्यांना इन्फ्रारेड किरण म्हणतो. त्याची तरंगलांबी ही ३८० ते ७५० नॅनोमीटर असते. रात्री फोटो अथवा व्हिडिओ काढण्याच्या साधनात याचा वापर करतात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात गर्मी निर्माण करण्यासाठी वापर. इन्फ्रारेड हिटर मध्ये वापर केला जातो.
मायक्रोवेव्ह किंवा अतिसूक्ष्म तरंग हे विद्यतू चुंबकीय तरंग असून यांची तरंगलांबी 1 मीटर ते 1 मिलीमीटर असते. हे रडार, सॅटेलाइट , रिमोट सेन्सिंग, मोबाइल फोन, इत्यादि मध्ये वापरले जातात. यांची वारंवारता 300 गिगा हर्ट्झ ते 300 मेगा हर्ट्झ असते.जेवढी कमी तरंगलांबी तेवढी वारंवारता वाढते. रेडियो तरंग हे तरंगलांबी 1 मीटर पेक्षा जास्त आणि वारंवारता ही 300 मेगा हर्ट्झ पेक्षा जास्त असते. आपल्या मोबाइल मध्ये संपर्क साधण्यासाठी रेडियो तरंगाचा वापर केला जातो. तसेच यासाठी आरएफ तरंग म्हणजे रेडियो आणि मायक्रोवेव्ह तरंग वापरले जातात.
हे सर्व तरंग काही मानव निर्मित आणि काही नैसर्गिक असले तरी त्यांचे विविध गुणधर्म विचारात घेता, ते शारीरिक द्र्ष्ट्या काही चांगले आणि वाईट परिणाम करतात. वैदयकीय शास्र मध्ये या पैकी काही किरणांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. मानसिक स्थिति आणि अवस्था यावर मात्र हे किरण अत्यंत सूक्ष्म रीतीने प्रभाव दाखवत असतात. अल्फा, बिटा आणि गॅमा हे किरण किरणोत्सरी मूलद्रव्याच्या अणू केंद्रातून निर्माण होत असल्याने त्यांचे प्रत्यक्ष संपर्क आल्यास शारीरिक व्यंग अथवा कॅन्सर अथवा त्वचाविकार संभवतात. सूर्याकडून येणार्या किराणा मध्ये 10 टक्के किरणे ही अतिनील किंवा अल्ट्राव्हायोलेट असतात. अतिनील किरण हे संपर्कात आले असता अंत्रस्रावी ग्रंथी आणि हार्मोन्स उत्तेजित होते. संशोधन असे सांगते की अतिनील किरण हे मानवी मनाचा मूड आणि नैराश्य यात वाढ घडवून आणणात. जर आपण जास्त वेळ अतिनील किरणांच्या संपर्कात राहिल्यास निरोगी जीवनशैली मध्ये अडथळे येतात. क्ष किरण तसेच अल्फा, बिटा आणि गॅमा किरण हे आयणीकिरण-विकिरण किंवा किरणोस्तार करतात. त्यामुळे कॅन्सर आणि मुटेशन होवू शकते. सूर्याकडून जी किरणे पृथ्वीवर येतात त्या पैकी 43 टक्के किरण हे अवरक्त किरण असतात. अवरक्त किरणांचा वापर करून काही मेंदूचे आजार बरे करतात. सध्या अवरक्त किरण निर्माण करणारे साधने वापरुन आरोग्य आणि फिटनेस उत्तम राखले जाते. चांगले स्वास्थ राखण्याच्या कार्यक्रमात अवरक्त किरण वापरुन मन आणि बुद्धी हे एका रेषेवर शांत आणि शीतल केले जातात. मायक्रोवेव्ह हे आयोनिकरण करतात. त्यांचा संबध मेंदू सोबत आल्यास त्याचे परिणाम मेंदूवर होतात हे काही अंशी सिध्द झाले आहे, परंतु हा संबंध दीर्घ स्वरूपाचा असावा लागतो. मोबाइलचा वापर वाढल्याने शारीरिक आणि मानसिक नकारात्मक परिणाम होतात. मोबाइल चा वापर केल्याने ,मायक्रोवेव्ह मात्र तुमची स्मृति आणि आकलन शक्ति यावर परिनाम करतात. मायक्रोवेव्हच्या आपण ज्यावेळी संपर्कात येतो त्यावेळी ते आपल्या पेशी आणि उत्ती यामध्ये कंपने निर्माण करतात, असेही काही संशोधन सांगते. इलेक्ट्रोसेफलोग्राफ म्हणजे मेंदू मधील कंपने आणि तरंग मोजणारे यंत्र होय. साहजिकच मोबाइल मधील हे तरंग आणि लहरी आपल्या मानसिक अवस्थेवर प्रभाव टाकतात. हे परिणाम अल्पकालीन आणि दीर्घकालीन असू शकतात. या तरंग आणि लहरी मुळे प्रचंड ताण आणि थकवा जाणवणे, संयम आणि लक्ष कमी होणे, कानात आवाज येणे आणि कान गरम होणे, ऐकू येण्याजोग्या समस्या निर्माण होणे, डोके दुखणे आणि असे विद्युत चुंबकीय तरंग अथवा सूक्ष्मलहरी- रेडियो लहरी चे अल्पकालीन परिणाम म्हणून पाहिले जाऊ शकतात. दीर्घकालीन परिणाम मध्ये अपरिवर्तनीय श्रवण विषयक समस्या, भ्रूण विकासास हानी पोहोचवणे, गर्भपाताचा धोका वाढणे, शुक्राणूंची संख्या कमी होणे, मेंदूच्या ऊतींचे नुकसान, हृदयाशी संबंधित समस्या, स्मरणशक्ती कमकुवत होणे, लिम्फोमा आणि अनुवांशिक रचनेचे नुकसान यांचा समावेश होवू शकतो.
विश्वात एकुण चार प्रकारची पायाभूत भौतिक बले आहेत. त्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल, विद्युत चुंबकीय बल, केंद्रीभूत कुमकुवत बल, केंद्रीभूत मजबूत बल यांचा समावेश होतो. मात्र यातील गुरुत्वाकर्षण बल हे सर्वात कुमकुवत आहे असे मानले जाते. गुरुत्वाकर्षण बल हे पृथ्वीच्या वातावरणात दिसून येते आणि ते सर्व ठिकाणी अनादि काळापासून एकसमान आहे. त्यामुळे आपल्या शरीराची वाढ, आपले चालणे, आपले उभे राहणे, आपले पळणे, आपले झोपणे आणि एकंदर आपले शरीर यावर उत्क्रांती स्वरूप बदल होत असतांना गुरुत्वाकर्षण बलाने त्यामध्ये इष्ट आणि अनुरूप बदल घडवून आणले आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मात्र त्याच्या अंगी सुद्धा गुरुत्वाकर्षण असते. या गुरुत्वाकर्षण बलाच्या आधारे चंद्र पृथ्वीवर आपला प्रभाव दाखवतो. त्यामुळे भरती आणि आहोटी आपणास पाहावयास मिळतात. आपल्या प्राचीन वाड्मय मध्ये चंद्र आणि त्याचे मानवी जीवनावरील प्रभाव याबाबत माहिती मिळते. फलज्योतिषातही चंद्राला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. चंद्र आणि त्याचे चार प्रमुख टप्पे म्हणजे अमावस्या, पहिली चतुर्थांश, पौर्णिमा आणि तिसरी तिमाही. चंद्राच्या त्याच्या कक्षेतील स्थितीनुसार, पृथ्वीवरील चंद्राचे गुरुत्वाकर्षण बदलते आणि समुद्राच्या भरतीचे आहोटी स्वरूप देखील बदलते. चंद्राच्या टप्प्यांचा मानसिक आरोग्य किंवा शारीरिक आरोग्य आणि आजार, शारीरिक हालचालीं आणि मानवाच्या पुनरुत्पादनाशी संबंध दर्शविला जातो. हे बदल पृथ्वीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या बदलांमुळे किंवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीतील बदलांमुळे आणि चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये भरती-ओहोटी किंवा जैविक भरती मधील बदलांमुळे होऊ शकतात. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांदरम्यान मानवी शरीरशास्त्रातील बदलांच्या दृष्टीने हालचाली होतात. आपली मानसिक स्थिति ही पौर्णिमा अथवा अमावस्या या वेळी तीव्र स्वरूप दाखवते, चंद्राचे गुरुत्वाकर्षांन उच्च आणि निम्न स्वरूप याला करणीभूत ठरते. भारतीय लोक बरीच आपली नवीन कामे आणि कार्यारंभ ही सूर्य आणि चंद्र यांची अवकाशातील स्थिति लक्षात घेवून ठरवत असत. आजही ही प्रथा आपल्याला या विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित असलेल्या जगात हे पाहावयाला मिळते.
पृथ्वीच्या भूपृष्टावर आपण दोन पायाच्या आधारे उभे राहतो. त्या अनुषंगाने पृथ्वीच्या केंद्र बिन्दु मधून दोन दोन प्रकारच्या लहरी तयार होतात. त्यांना P लहरी आणि S लहरी संबोधले जाते. या लहरी या आपली पृथ्वी कि जी घन आणि द्रव पदार्थ म्हणून बनलेली आहे तिच्या मार्फत तयार होतात. आपण ज्यावेळी चालतो त्यावेळी आपल्याला या लहरी जाणवत नाहीत. मात्र काही प्राणी जसे कुत्रा, साप, मांजर यांना त्या जाणवतात. मात्र भूकंप आणि ज्वालामुखी यामुळे या लहरी आपल्याला जाणवू शकतात. या लहरी सुद्धा आपल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थावर प्रभाव दाखवतात.
ध्वनि लहरी ह्या पृथ्वीच्या वातावरणमध्ये अस्तित्वात असतात. या ध्वनि लहरी तीन प्रकारच्या दिसून येतात. यात इन्फ्रा सोनिक, सोनिक, अल्ट्रा सोनीक यांचा समावेश होतो. २० हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता असलेली ध्वनि लहरी इन्फ्रा सोनिक यात येतात, २० हर्ट्झ ते २०००० हर्ट्झ वारंवारता असलेली ध्वनि लहरी सोनिक यात येतात आणि २०००० हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता असलेली ध्वनि लहरी अल्ट्रा सोनीक यात येतात, कुत्रे, वटवागळू हे ध्वनि ऐकू शकतात. अल्ट्रा सोनीक ही कंपने भूकंप झाल्यावर तयार होतात. ध्वनिचा वापर करून मानसिक आणि शारीरिक आजार बरे करणाऱ्या पद्धतीला ध्वनि उपचार पद्धती किंवा थेरपी असे म्हणतात. या उपचार पद्धती मध्ये मन, आत्मा, आणि शरीर याल लयबद्ध केले जाते. त्यासाठी सरासरी १०० ते ८०० हर्ट्झच्या तरंगलहरी निर्माण करून त्यापासून उपचार केले जातात. मनुष्य प्राणी हा कान या महत्वाच्या इंद्रिय मार्फत ध्वनी ग्रहण करतो. असा ध्वनी हा २० हर्ट्झ ते २० किलो हर्ट्झ असेल तर मानवी कान त्याला ग्रहण करतात. साहजिकच या रेंज मधील तरंग लहरी आजूबाजूला असतात. साहजिकच या लहरी व्यक्तीच्या वर्तनावर निश्चितच परिणाम करत असतात. जर आजूबाजूला गोंगाट असेल तर आपले मन आणि चित्त अस्थिर राहते आणि तसेच आपले हृदयाचे ठोके वाढून आपली चिडचिड होते. या उलट आजूबाजूला शांतता असेल तर मन आणि चित्त स्थिर राहते.
आपल्या मेंदू मध्ये सुद्धा वेगवेगळे तरंग आणि लहरी निर्माण होत असतात. या लहरी आणि तरंग यांना विद्युत रासायनिक तरंग असे म्हणतात. आपला मेंदू हा कि ज्याचे वजन हे १५०० ग्राम आहे आणि त्यात मज्जापेशी आणि मज्जातंतू यांचे जाळे पसरलेले असते. या मेंदूत अनेक प्रकारच्या विद्युत रासायनिक प्रक्रिया मार्फत तरंग अथवा लहरी निर्माण होतात. या लहरी किंवा तरंग यांना गॅमा, बीटा, अल्फा, थिटा आणि डेल्टा अशी नावे दिली जातात. इलेक्ट्रो एन्सेफॅलोग्राम द्वारे मेंदूतील वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या लहरी मोजतात. गॅमा तरंग हे ३० हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता निर्माण करतात. बीटा तरंग हे १३-३० हर्ट्झ वारंवारता निर्माण करतात. अल्फा तरंग हे ८-१२ हर्ट्झ वारंवारता निर्माण करतात. थिटा तरंग हे ४-८ हर्ट्झ वारंवारता निर्माण करतात. डेल्टा तरंग हे ४ हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता निर्माण करतात. आपला मेंदू ज्यावेळी तल्लख आणि हुशार असतो आणि निर्णयक्षम असतो त्यावेळी गॅमा अवस्था असते. ज्यावेळी आपण जागरूक असतो आणि आकलनक्षम असतो त्यावेळी आपली बीटा अवस्था असते. आपल्याला ज्यावेळी शांत आणि शीतल वाटते. आपण काम शांतपणे मन लावून करतो त्यावेळी अल्फा अवस्था असते. ज्यावेळेस आपण संमोहन स्थिति, कल्पनारम्य, सर्जनशील, खोलवर आठवणीमध्ये, ध्यानात , अध्यात्म ,योग यात असतो त्यावेळी थिटा अवस्था असते. आपण ज्यावेळी झोपेत असतो त्यावेळी ती डेल्टा अवस्था असते. आपला वावर ज्यावेळी या पृथ्वीतलावर चालू असतो आणि आपला जीवनविषयक प्रवास सुसह्य कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असतो. साहजिकच आशा वेळी आपण आपल्या आजूबाजूला, परिसरात आणि वातावरणात अस्तित्वात असलेले विविध तरंग आणि लहरी आणि त्यांचा मन आणि मेंदू यांचेशी संबंध समजून घेवून त्या प्रमाणे त्याला अधिक जागरूक आणि तल्लख करावे लागते. या अवस्था आणि त्यातील तरंग कळले की आपण त्या प्रमाणे ध्यान ,प्रार्थना, अध्यात्म , योग, प्राणायाम याचा वापर करून उच्च अनुभूति प्राप्त करू शकता.
आशा प्रकारे हे सर्व तरंग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणाने मानवी शरीर, मेंदू, आणि मन यावर वेळोवेळी प्रभाव साधत असतात. त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी गेल्यावर खूप उत्साही वाटते तर काही ठिकाणी गेल्यावर खूप नैराश्य निर्माण होते. तसेच काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर उत्साह निर्माण होतो तर काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर नैराश्य निर्माण होते. काही काम करतांना खूप आनंद होतो तर काही काम करतांना कंटाळवाणे वाटते. या मागे त्या ठिकाणी असणाऱ्या उच्य, मध्यम आणि सूक्ष्म लहरी अथवा तरंग ह्या प्रभाव दाखवत असतात. साहजिकच आशा लहरींना भाव असतात आणि त्यांना सकारात्मकता आणि नकारात्माकातही असते. त्या मुळे सहाजीकच आशा लहरी ह्या प्रेरणा, उत्साह कसा निर्माण करतात किंवा निरुत्साह कसा निर्माण करतात हे आपल्याला जाणता येयला हवे. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक वेगळी अनुभूती का निर्माण होत असावी. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर चित्त शांत का होते. आश्रमात अथवा पवित्र ठिकाणी शीतलता का लाभते. या सर्व गोष्टी मागे विविध लहरी, तरंग आणि बले कार्यरत असतात. अशी बले जैविक आणि अजैविक घटक निर्माण करत असतात हे लक्षात घ्यावे. त्यासाठी आपल्या संपर्कात आलेली जैविक घटक आणि त्यातून निर्माण होणार्या सकारात्मक लहरी जाणून घेणे आणि त्याचे वलय आपल्या भोवताली निर्माण करणे आवश्यक ठरते. आपण राहतो आणि काम करतो तो परिसर आणि वातावरण या ठिकाणी जैविक सोबत अनेक अजैविक घटक कार्यरत असतात. त्यांचे सुद्धा महत्व लक्षात घेवून त्यातून सुद्धा सकारात्मक लहरी, तरंग आणि बले कशा प्रकारे तयार करून त्यातून आपली उन्नती , विकास , प्रगती आणि मन शांती कशी साधता येईल यासाठी आपण निरंतर प्रयत्नशील राहून एक साधे, सोपे, सरळ , शांत, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्याकडे सुखदायक आणि शीतल अशी वाटचाल करावी.
४६/१०१ दिनांक १०.०४.२०२२
रामनवमी
सुखाच्या शोधात©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७