अनुभव -विचार

नाती कशी टिकतील यावर दैनिक नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख

************************************************************************************************************************

यशमंथन या यशादाच्या मासिकात तणाव व्यवस्थापन कौशल्ये हा लेख प्रसिद्ध झाला

******************************************************************************************************************************

 

गुणवत्ता व समर्पण 

    गायकाचा गळा कितीही सुंदर असला तरी, रियाजाशिवाय त्‍या गळयातून सप्‍त सुर बाहेर पडू शकत नाही. त्‍याचप्रमाणे गुणवत्‍ता असूनही त्‍या गुणवत्‍तेला परिश्रमाची जोड नसेल तर त्‍या गुणवत्‍तेच मोल शुन्‍य राहतं. माणसं नेहमी स्‍वतःला ओळखण्‍यात चुकतात. स्‍वतःबददल असणारा अहंकार त्‍यांना कधीही आत्‍मपरिक्षण करण्‍याची संधी देत नाही. अशी माणसे नेहमी स्‍वतःला पुढे ढकलत राहतात. आपल्‍या अपयशाचं खापर नेहमी आपल्‍या दुःखमय परिस्थितीवर फोडतात. त्‍यांच्‍या मनाची आंदोलने सारखी वरती खाली होत असतात. स्‍वतःला निराशेच्‍या गर्तेत ढकलून दुःख करत बसतात. परंतू कोणतीही कृती करण्‍याचा प्रयत्‍न ते करत नाहीत. या माणसांमधील आपण एक आहोत का ?

    कोणत्‍याही क्षेत्रात प्रवेश करा, तुम्‍हाला स्‍पर्धा करावीच लागेल. आपल्‍यासारखी सामान्‍य बुध्‍दीची माणसे निराशेच्‍या गर्तेत ब-याचदा अडकतात व स्‍वतःला हरवून बसतात. काळाचा मलम दुःखावरची खपली काढून टाकतो. आपण जोमाने अभ्‍यासाला व कामाला लागतो परंतू निराशेच्‍या गर्तेत गमवलेला वेळ आपल्‍यापासून खूप दूर गेलेला असतो. आणि तो पुन्‍हा आपल्‍याला कधीही मिळत नाही.    कोणत्‍याही ध्‍येयाकडे अग्रेसर होतांना वेळेचं मुल्‍य (Value) किती अनमोल (Milestone) असते याचं उत्‍तर अगदी 1 मार्कावरुन पोस्‍ट हुकलेल्‍या व्‍यक्‍तीला विचारा किंवा ऑलम्‍पीक पदक हुकलेल्‍या खेळाडूला विचारा. व्‍यक्‍तीची ताकद (Power) त्‍याच्‍या गुणवत्‍तेत नसते तर समर्पणात असते (Devotion). त्‍यामुळे आयुष्‍यात कोणतीही गोष्‍ट मिळवायची असेल तर तुम्‍ही स्‍वतःला समर्पित करा. अगदी 100%. तेव्‍हाच ती गोष्‍ट तुम्‍हाला मिळेल.

    स्‍वतः विषयी कमी बोलण्‍यास शिका. दुस-याचं बोलणं पुर्ण एैका. त्‍यानंतरच तुम्‍ही तुमचं म्‍हणनं योग्‍य शब्‍दात व थोडक्‍यात मांडा. उगाच स्‍वतःच भांडवल करु नका. इतरांना बोलण्‍याची संधी दया. जास्‍त बोलण्‍यापेक्षा जास्‍त एैकणं कधीही श्रेयस्‍कर. स्‍वतःचा आत्‍मविश्‍वास तुम्‍ही हरवून बसला अस्‍साल तर उठा जागे व्‍हा व कृती करा. यश तुमचेच आहे. आज तुम्‍ही कष्‍ट करतांना रडत असाल परंतू उदया तुम्‍हाला तुमच्‍या चेह-यावर हास्‍य आणायचे असेल तर तुम्‍हाला आज रडावेच लागेल. काळया ढगातूनच किरणे बाहेर येतात, काळोखी रात्र अनुभवल्‍याशिवाय तेजोमय सकाळ अनुभवली जात नाही. हे जवढे खरे तेवढेच कष्‍ट घेतल्‍याशिवाय यश मिळत नाही. हे खरे आहे.

    स्‍वतःच्‍या अतर्मंनात / आत्‍म्‍यात प्रवेश करा. आपण कोण आहोत ? आपल्‍याला काय करायचं आहे ? आपण कोठे आहोत ? आपण चुकत आहोत का ? आपण काय करायला हवं ? हे पाच प्रश्‍न त्‍या अंतर्मनाला विचारा ते मन तुम्‍हाला या पाच प्रश्‍नांची उत्‍तरे निसंकोचपणे देईल. हे सर्व झाल्‍यावर फक्‍त पाचव्‍या प्रश्‍नाला अग्रक्रम दया. मग पहा दुस-या प्रश्‍नाचं उत्‍तर तुम्‍हाला लवकरच मिळेल.

    इतरांच्‍या टिकेला व्‍यवस्थित सामोरे जा. अन्‍यथा त्‍या टिकेकडे दुर्लक्ष करा. संकुचित वृत्‍तीच्‍या लोकांकडे दुर्लक्ष करा. या सर्व गोष्‍टींपेक्षा आपल्‍या ध्‍येयाची व्‍याप्‍ती खूप मोठी आहे हे लक्षात ठेवा. आयुष्‍यात ध्‍येयाकडे मार्गक्रमण करताना लहान मोठी दुःखे, संकटे, अपयश तुम्‍हाला अडवणार नाहीत. याची तुम्‍ही काळजी घ्‍या.

    शेवटी एकच गोष्‍ट लक्षात घ्‍या, जो आळशीपणा झटकतो, स्‍वतःला ओळखतो, कष्‍ट करतो, स्‍वतःला समर्पित करतो, कधीही विचलीत होत नाही, आशावादी असतो. आज जरी माझा नसला तरी उदयाचा दिवस माझा आहे असं समजतो व  स्‍वतःवर विश्‍वास ठेवतो तोच या जगात यशस्‍वी होतो.

राजू नंदकर,

उपजिल्‍हाधिकारी, जालना

9970246417

*********************************************************************************************************************************
परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज
*दिनांक 24 जुले 2020 सांयकाळी 5.30 वाजता*
प्रसारित होणाऱ्या *युवावाणी* या कार्यक्रमात माझी 30 मिनिटांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत सुमेधा कुलकर्णी आकाशवाणी परभणी केंद्र यांनी घेतली आहे .
*विषय :आजचे युवक व स्पर्धा परीक्षा*
आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता ऐकू शकता आपल्या मोबाईल अँप वर 👇
अप्लिकेशन डाउनलोड करा-रेडिओ आयकॉन ला क्लिक करा-Parbhani टाईप करा-केंद्र सर्च करा.
Listen to AIR PARBHANI Radio live on Prasar Bharati’s NewsOnAir App. Download the App from https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
 
*********************************************************************************************************************************
लहानपणीच मुलांचे पाय चिखलात रुतावले की ती हवेत जात नाहीत…… अनुप नंदकर @बोरघर(पुणे)
 
 
 
*********************************************************************************************************************************
तुमच्या माध्यमिक शाळेत तुह्मी जेव्हा प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून जाता…….खूप अभिमान वाटतो!
जनता विद्या मंदिर घोडेगाव ..ता.आंबेगाव जिल्हा पुणे.
 
 
 
*********************************************************************************************************************************
 
 

व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य _राजीव नंदकर _उपजिल्हाधिकारी Personality Development and Communication Skills _Rajiv Nandkar_Deputy Collector. # personalitydevelopment #rajunandkar