आरोग्य

     

*Eat Fruits and Stay Healthy*
खरबूज फळ खाण्याचे फायदे

  

*********************************************************************************************************************************
*Eat Fruits and Stay Healthy*
लिंबू वर्गीय(Citrus) फळे खाण्याचे फायदे 👇
*********************************************************************************************************************************
Save Farmer Save India Campaign.
Eat Healthy Stay Healthy
*********************************************************************************************************************************

#Jalnahalfmarethon2019 Three consecutive years participation.feeling happy and healthy.

********************************************************************************************************************************
Dear Rajiv Sitaram Nandkar, Congratulations on successfully completing Jalna Half Marathon 2018 – 10 KM Run in 01:22:25. My Race Timing Solutions
*********************************************************************************************************************************
Please read my article..
मुलांचे संगोपन अन संस्कार .
मुलाचे संगोपन व संस्कार हा विषय मानस शास्राचा ,सामाजिक शास्राचा व जीव शास्राचा आहे. या तीनही शास्राच्या अनुषंगाने हा विषय तपासून घेण्याचा प्रयत्न या प्रस्तुत लेखात करण्यात आला आहे . मुल जन्माला आल्या नंतर त्याची शाररिक , बौद्धिक व मानसिक वाढ काळानुसार व वर्षोगणिक होत असते. साधारण पणे ०-६ वयोगट हा बाल्यावस्थेत येतो,६-९ ह वयोगट पौगड्या अवस्थेत येतो , ९- १४ हा वयोगट कुमार अवस्थेत येतो, १४ ते ३४ हा वयोगट तरुण अवस्थेत येतो तर ३५ ते ६० ही प्रोढ अवस्था समजली जाते शेवटी ६० च्या पुढे वृध्द समजले जाते .या लेखाच्या मर्यादा आपण मुले व त्याचे तरुणपण एवढीच मर्यादित ठेवली आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे .
मुलांचे संगोपन करणे व त्यांच्यावर विविध मुल्ये यांचे संस्कार करणे ही जबाबदारी सामाजिक शास्रानी पालक म्हणजे आई ,वडील व शिक्षक यांच्यावर टाकली आहे . आपल्या भारत देशात ही जबाबदारी पालक यतार्थ पणे मुलांचे वय वर्ष ३४ होवे पर्यंत विनासायास पार पडत असतात . वास्तविक जैविक शास्रात कोणताही प्राणी इतके वर्ष आपल्या पिलांचा सांभाळ व संगोपन करत नाही . मुलांचे संगोपन करत असतानी आपण ०-३४ वय असा सरसकट विचार करतो हेच मुळी चुकीचे आहे, वास्तविक उपरोक्त निर्देशित अवस्थेप्रमाणे त्यांचा विकासाचा पाया रचणे जास्त श्रेयष्कर ठरते . त्याच सोबत विविध शास्र जसे जैविक,मानस,सामाजिक याचा योग्य वेळी योग्य वापर करणे हितावह असते.मुल घडवण्याचे अथवा ते सुसंस्कृत व कर्तुत्ववान बनवण्याचे असे कोणतेही सूत्र उपलब्ध नाही . तर मुले वाढत असताना अनेक घटकांचा त्यांच्यावर पडत असलेले प्रभावाने हळूहळू ते उत्कर्ष पावत असतात .या घटकांपैकी आई ,वडील, कुटुंब , नातेवाईक ,शिक्षक ,मित्र व समाज हे दृश्य घटक त्या वाढणाऱ्या मुलावर प्रभाव पडत असतात . ह्या घटकाचे प्रभाव व कार्य हे एकसारखे नसून ते बदलणारे व कमीजास्त होणारे असते आणि त्यामुळे एक घटक प्रभावी असून चालत नाही तर योग्यवेळी तो तो घटक प्रभावी व्हावा लागतो . ज्या प्रमाणे एखांदी औषधी आपण घेतो व त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात त्या प्रमाणे ह्या घटकांचे सकारात्मक व नकारातात्मक प्रभाव त्या मुलावर पडत असतात.
मुले ही मातीचा गोळा असतात असे आपण म्हणतो,अशा या गोळ्याला आकार देण्याचे काम विविध घटक करत असतात.सद्याच्या जीवन शैलीत गर्भ पोटात असतानाच त्यावर संस्कार केले जातात. विविध शिबिरे, कार्यशाळा, चर्चासत्रे यातून जन्माला येणाऱ्या मुलावर संस्कार कसे करावे याचे धडे दिले जातात . हे जरी आवश्यक व नियमाला धरून असले तरी बऱ्याच वेळा त्याची अतियोशक्ती झालेली आपणास दिसून येते .बरे असो आपल्या मूळ मुद्याकडे आपण परत येवू की मुलांचे संगोपन व संस्कार बाबत अनेक घटक कसे कारणीभूत होतात यावर आपण नियंत्रण कसे मिळवू शकतो .आपले मुल जन्माला आल्या पासून ते प्रोढ होइपर्यंत त्यावर अनेक घटक प्रभाव दाखवत असतात ,मात्र यातील काही घटक हे पालक नियंत्रित असतात तर काही घटक ते मुल नियंत्रित करत आसते तसेच या वेळी बाह्य घटक तेवढेच प्रभावी ठरत असतात .त्या अनुषंगाने आपण या घटकांचा योग्य वेळी प्रभाव कसा वाढवायचा व योग्य वेळी प्रभाव कमी कसा करायचा याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .
आई व वडील यांच्या मिलनातून सुप्रजा जन्माला येते . आई व वडील यांचे गुण सूत्रांचे मिश्रण आपल्याला त्या मुलाच्या अतरंग व बाह्यरंग यात पाहायला मिळते .एकंदर काय मुल हे जैविक रित्या आई व वडील यांचे पासून निर्माण झालेली प्रोजेनी असते .साहजिकच त्या अनुषंगाने अवयवजन्य उदासीनता (Inbreeding depression) व संकरीत जोम ( Hetrosis )ह्या संकल्पना ची माहिती वाचकापर्यंत पोहचवणे आवश्यक ठरते . हिंदू रिवाजाप्रमाणे एका गोत्रात लग्न केली जात नाहीत याच्या मागे खूप मोठा जैविक आधार आहे . जीव शास्रानुसार एकाचा नाते संबधात लग्न केल्याने अवयवजन्य उदासीनता (Inbreeding depression) निर्माण होवून जन्माला आलेले बालक मानसिक व शारीरिक दृष्ट्या म्हणावे तेवढे सक्षम होवू शकत नाही . याउलट दूरच्या नाते सबधात लग्न केल्याने संकरीत जोम ( Hetrosis ) होवून जन्माला येणारी प्रोजेनी ही सक्षम व प्रतिकारक्षम निर्माण होते. एकंदरच मुले जन्माला आल्यानंतर ते आई वडील त्याचे दोन आजोबा व दोन आजी यांचे काही गुण वैशिष्टे घेवून जन्माला आलेले असतात.
एकदा मूळ जन्माला आले की शून्य ते सहा या वयोगटात त्यांचा संबध आई व वडील यांच्याशी जास्त असतो व तो साहजिकच आहे .ह्या वयोगटात मुले संस्कार आत्मसाद करत जरी नसली तरी त्यांच्या विविध सवयी नियंत्रित करणे त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करून देणे बाबतची दक्षता या वयात पालकांनी घेणे गरजेचे असते . जसे एखांदे फुल कळीच्या स्वरुपात असेल तर त्याला जपावे लागते त्याच प्रकारचा काहीसा हा प्रकार आहे .या वयात त्यांना गोष्टी सांगणे, आपले नातेवाईक व कुटुंबीय कोण आहेत याची ओळख करून देणे , खाण्याच्या सवयी याच वयात मुले आत्मसाद करतात त्यामुळे खाण्याच्या सवयी ह्या चौरस आहार युक्त ठेवण्याकडे कल पालकांचा असणे अगत्याचे तसेच अनिवार्य ठरते. ह्या वयात मुलाच्या मेंदूची वाढ होत असल्याने ह्या वयात पोषणआहार व आरोग्य यावर पालकांनी भर देणे गरजेचे आहे.
सात ते चौदा हे वय म्हणजे किशोर वय किंवा कुमार वय ह्या वयात मुलांचा बराचस वेळ शाळेत व्यतीत होत असतो .साधारणपणे आठ तास शाळा, आठ तास घरी व आठ तास झोप याप्रमाणे दिनचर्या ठरलेली असते . म्हणजे पालकांना मुलांचे सरासरी फक्त आठ तास उपलब्ध होत असतात. काही वडिलांना तर मुले दोन ते चार तासच उपलब्ध होतात. या वयात मुले खोडकर व हट्टी झालेली असतात .हे वय मुलांच्या वाढीसाठी व संगोपन व संस्कार साठी खूप महत्वाचे असते . मात्र पूर्वीच्या बाल्या अवस्थेमध्ये जेवढे लक्ष बालकाकडे दिले जाते त्यापेक्षा खूप कमी लक्ष या किशोर कडे दिले जाते आणि इथेच घोळ होतो.वास्तविक हा काळ संवेदनशील व नाजूक असतो. मुले आता त्यांचे विचार प्रकट करत असतात. त्यांची ते वैयक्तिक मते बनवत असतात. राग, लोभ, मस्तर, असूया व चीड ह्या नकारात्मक भावना तर आनंद, हर्ष, प्रसनता व समाधान या सकारात्मक भावना त्यांचे मध्ये निर्माण होत असतात. विविध हार्मोन्स चा सुद्धा स्राव शरीरात होत असल्याने त्या प्रमाणे त्यांच्यात मानसिक व भावनात्मक बदल होत असतात .या काळात सर्वच जोडप्यांना दुसरे मुल झालेले असल्याने साहजिकच एक्केकेंद्री कुटुंब असेल तर आई व वडील या दोघांचे दुर्लक्ष थोरल्या मुलाकडे होते आणि नेमकी या वेळी इतर जे नकारात्मक घटक ज्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत ते प्रभावी होतात. एकंदर या वयात उपलब्ध होणारे आठ तास आई व वडील यांनी या मुलांना देण्याचा कसोशीने प्रयत्न केला तर बऱ्यापैकी मुलांची शारीरिक व मानसिक निकोप वाढ होवू शकते. मूल घरी आल्यानंतर त्याची चौकशी करणे, त्याच्या मित्रा बाबत विचारणे,, शाळेत काय शिकवले या बाबत त्याला विचारणे, त्याच सोबत त्याला विश्वासात घेणे या शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी जरी पालकांनी रोज पूर्ण केल्या तरी त्याचा फायदा आपल्या लगेचच दृष्टीक्षेपात येतो. एकंदरच किशोरवयात किमान ८ तास मुलांना पालकांनी देणे व त्यांच्यात विश्वास व सकारत्मकता निर्माण करणे ही संस्कार व संगोपनाची पहिली पायरी ठरते .
पंधरा ते चोवीस हा वयोगट तरुण म्हणून संबोधला जातो. आता हे तरुण पालकांच्या बंधनातून मुक्त होवून स्वस्चंदी झालेली असतात तसेच विहार व व्यवहार करण्यास ते तयार झालेले असतात . या वयात मुले आठ तास झोप ,आठ तास कॉलेज, चार तास घरी व चार तास बाहेर वावरत असतात असे ढोबळ पणाने म्हणता येते व तशी सर्वसाधारण परीस्तीती असते . या वयात मुले अनियंत्रित व बंडखोर झालेली असतात आणि पालकांची जरी जबाबदारी वाढलेली असली तरी इतर घटक मोठ्या प्रमाणावर मुलांवर प्रभाव पाडत असतात. असे असले तरी पालकांची भूमिका डावलून अथवा बाजूला सारून चालत नाही .या वयात मुले घरातील चर्चेत सहभागी होण्याचे टाळत असतील तर ती एक धोक्याची घंटा आहे हे पालकांनी ओळखले पाहिजे. एकदा संवाद तुटला की तो परत जोडणे खूप अवघड होते. त्यामुळे आपली मुले कोठे जातात, काय करतात , त्यांचे मित्र कोण या बाबत डोळसपणे व अस्तावायिकपणे चौकशी करणे पालकांकडून आवश्यक व अनिवार्य ठरते. बऱ्याच वेळा मुले मोठी झाली त्यांना सर्व कळते त्यांना त्यांचे निर्णय घेवू द्या असा भोळा भाबडा विचार पालक करतात आणि मोठी चूक करून बसतात .वास्तविक मुलांचे निर्णय वास्तुस्तीतीशी तपासून घेतले की ते चुकण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळे मुलांकडे निर्णय क्षमता असावी मात्र ते निर्णय एकतर्फी असणार नाहीत याची दक्षता सुज्ञ पालकांनी घेणे आवश्यक आहे.मुलांनी हव ते कराव पण एकदा पालकांकडून ते तपासून घेवून कराव.पालकांनी मुलांचे आई व वडील या भूमिकेतून बाहेर येवून मित्र व मैत्रीण ही भूमिका स्वीकारली कीअर्धी मोहीम फत्ते झाली असे समजा .
शून्य ते सहा वयोगटात मुले आपले आई वडिलांशी सलग्न असल्याने इतर नातेवाईक व कुटुंबीय जसे आजी , आजोबा, भाऊ, बहिण, आत्या ,मामा,मामी , काका , काकू, मावशी इत्यादी सोबत येणारे त्यांचे संबध हे औपचारिक स्वरूपाचे असतात. लहान बालकास फक्त तोंडओळख यापलीकडे काही माहित नसते . किशोर वयात मात्र मुले नातेवाईक यांच्या कडे जायाला लागतात. विविध विचार व भावनाचे आदान प्रदान ते नातेवाईक व कुटुंबातील इतर सदस्य यांचे सोबत करायला लागतात . अश्या वेळी पालकांनी मुलांचा सवांद सकारात्मक असणाऱ्या नातेवाईक सोबत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे व नकारात्मक असणाऱ्या व वाईट सवयी असणाऱ्या नातेवाईक यांचे पासून मुलांना दूर ठेवणे हितावह असते. बऱ्याच वेळा काही पालक पूर्णतः मुलांचा संबंध नातेवाईक पासून तोडतात हे योग्य नाही . यामुळे मुले एकलकोंडी तर बनतातच परंतु त्यांचे मध्ये आपल्याविषयी, नातेवाईक विषयी असणारी आपुलकीची भावना हळू हळू नष्ट होते. सबब पालकांनी या बाबत काळजी घेणे आवश्यक ठरते .तरुण वयात नातेवाईक यांचे समवेत ते सल्ला मसलत ते करत असतात म्हणून योग्य वेळी मार्गदर्शन सुद्धा आवश्यक असल्याने नातेवाईक मुलांच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडतात .मात्र त्यासाठी आत्मीयता व संवाद असणे अगत्याचे ठरते . पालकांनी अगदी लहान वयापासूनच मुलांची योग्य व सकारात्मक नातेवाईक व कुटुंबीय यांचेशी जवळीक व आत्मीयता निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत .
किशोर वयात मुले आपल्या मित्रांच्या खूप जवळ असतात .त्यांचे भावना ते मित्रांजवळ व्यक्त करत असतात.जवळपास या वयात शेजारी राहणारे मित्र व शाळेतील मित्र अशी ढोबळ मानाने वर्गवारी करता येते . जवळपास या मित्रा सोबत मुले बारा तास घालवत असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाचे मित्र कसे आहेत. त्यांच्या सवयी कश्या आहेत. आपला पाल्य त्यांच्यामध्ये कश्या प्रकारे वर्तन करतो या बाबत जागरूक व दक्ष असणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याचे मित्रांना घरी बोलवणे त्यांची विचारपूस करणे यामुळे मुलांना आत्मविश्वास प्राप्त तर होतोच शिवाय पालकांबद्दल पाल्यांचे प्रेम यामुळे वृद्धिंगत होते. तरुण वयात मुले पूर्णतः मैत्रीनी व मित्र यांचे आहारी गेलेली असतात .योग्य व चांगले मित्र यशाच्या शिखरावर आपल्याला विराजमान करतात तर निर्बुद्ध व व्यसनी मित्र आपल्या पाल्याला खड्यात घालतात हे पालकांनी कायम लक्षात ठेवावे. या वयात बरेच निर्णय हे बहुमतावर आधारित व ग्रुपचे एकविचाराने घेतलेले असतात. त्यामुळे ते चांगले अथवा वाईट असो ते या ग्रुप कडून स्वीकारले केले जातात. सर्वसाधारण पणे मुलांच्या विचार व आचार या वर पूर्णतः मित्रांचे नियंत्रण प्रस्तापित झालेले असते . आता ही मित्रत्वाची उर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हे ओळखणे पालकाचे आद्य कर्तव्य ठरते . नाहीतर मुले वाईट वळणावर गेल्याचे उशिरा लक्षात आल्यास त्यापासून परावृत्त करणे पालकांना एका ठराविक वेळेनंतर शक्य होत नाही. सबब मुलांचे मित्र कोण आहेत ते काय करतात त्यांचे आई वडील काय करतात याबाबत मुलांच्या पालकांना माहित असणे महत्वाचे आहे. एकदा की आपल्या पाल्याची मित्राचे वर्तुळ आपणास माहित झाले की आपल्या प्रत्येक गोष्टीचा अंदाज बांधणे व पडताळणी करणे शक्य होवू लागते. साहजिकच मुलांना त्याच्या मित्रासोबत वृद्धिंगत करणे आवश्यक असते. पालक येथेच चुकतात कीते पाल्याला मित्रापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात .मात्र योग्य चिकित्सा करून चांगले मित्र यांना पाल्याच्या सोबत राहणेस प्रोत्साहन देणे व वाईट मित्रांपासून आपल्या पाल्याला दूर करणे यासाठी विशेष व चाणाक्ष प्रयत्न पालकांनी करणे गरजेचे आहे.
शिक्षक हा व्यक्ती मुलांच्या जीवनामध्ये मोठा प्रभाव पाडत असतो मुले लहानपणापासूनच आपल्या मनातील भाव भावना या शिक्षकांच्या समोर व्यक्त करत असतात. त्यांच्या दृष्टीने शिक्षक हाच त्यांचा मार्गदर्शक गुरु असतो. जेव्हा कुमार वयात येतात त्यावेळी या शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. मुलांचे वर्तन नियंत्रित करणे मुलांना योग्य असे संस्कार करणे याबाबत शिक्षकाची भूमिका शालेय वेळेत महत्त्वाची ठरते. असे दिसून येते की बरेच पालक आपल्या शिक्षकांच्या विषयी बऱ्याच गोष्टी गृहीत घेऊन वावरत असतात त्यामुळे त्यांचे त्यांच्या पाल्याकडे तर दुर्लक्ष होतेच मात्र त्यांच्या पाल्याची प्रगती त्यांना समजून घेता येत नाही किंवा ती जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. बरेच पालक असेही असतात की ते पूर्णतः आपल्या पाल्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवून रिकामे होतात वास्तविक शिक्षक व पालक हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परस्परपूरक कार्य करत असतात त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी दक्ष राहणे व दक्ष शिक्षकांनी विद्यार्थ्यांबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे ठरते. तरुण वयात शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते हे मित्रत्वाचे असायला हवे त्यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी यांचे आदान-प्रदान विद्यार्थी व शिक्षक यांच्या मध्ये होते. सर्वात शेवटी याचा फायदा विद्यार्थ्याच्या विकासात्मक वाढीवर होतो त्यामुळे एक योग्य व सुयोग्य कौशलाधीष्टीत नागरिक घडवण्याचे जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडते .मुलांचे वर्तन योग्य राहण्यासाठी व त्यांची वर संस्कार योग्य होण्यासाठी प्रत्येक पालकांनी शिक्षकाच्या संपर्कात राहणे व शिक्षक व पाल्य यांचे समायोजन घडून आणणे अगत्याचे ठरते .
अशा पद्धतीने सामजिक ,जैविक व मानस शास्राचे विविध पैलूतून मुलांच्या संगोपनाचा विचार केला .योग्य वेळी योग्य प्रमाणात पालकांनी कुटुंबीय , नातेवाईक , मित्र ,शिक्षक यांचे समायोजन केले तर वेगळ्याने मुलांचे संगोपन व संस्कार करण्याची आवश्यकता राहत नाही . चला एक सुजान तरुण की जो स्वताच्या , कुटुंबाच्या ,समाजाच्या व एकंदरच देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत नेतो तो निर्माण करण्याची जबाबदारी पेलूया .
राजू नंदकर ,
उपजिल्हाधिकारी जालना
9970246417
rsnandkar@gmail.com
*********************************************************************************************************************************
Dear Rajiv Nandkar, Congratulations on successfully completing Jalna Half Marathon 2017 -10K run
With hon’ble Collector and SP sir.