हे असच का घडत ! ते तसच का घडलं ! यांनी असच वागल पाहिजे ! त्यांनी तसच वागल पाहिजे !
हे असच का घडत ! ते तसच का घडलं ! यांनी असच वागल पाहिजे ! त्यांनी तसच वागल पाहिजे !
आपण जन्माला येतो आणि आपली शारीरिक व मानसिक वाढ सुरू होते. काही उदीष्टे आणि त्या उदीष्टांच्या अनुरूप ध्येये घेवून आपण आपली जीवनरूपी वाटचाल करत असतो. आपली स्वत:ची एक अंतर्गत व बाह्य संरचना असते. अंतर्गत शरीर रचनेत आपले शरीर, ज्ञांनेंद्रिये, मेंदू व मन तर बाह्य संरचना मध्ये आपले व्यक्तिमत्व, वागणे, दृष्टीकोण आणि सवयी याचा समावेश होतो. या अंतर्गत व बाह्य संरचना यावर अनेक बाह्य घटक जसे परिणाम करत असतात तसे आपल्या अंतरंगातील विविध घटक सुद्धा यावर प्रभाव पाडत असतात. त्यामुळे बाह्य घटक व अंतर्गत घटक यांचे व्यवस्थापन कसे करावे यावर या लेखात प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न आपण करणार आहोत.
हे असच का घडत ! ते तसच का घडलं ! यावर जास्त विचार करत राहणे नेहमीच आपल्याला त्रासदायक ठरत असते. त्यामुळे एखांदी अनपेक्षित व मनाविरुद्ध घटना घडली की आपण विचलित होतो आणि मन शांती हरवून बसतो. मात्र या विचलितपणाला आपण सकारत्मकतेची व कृतीची जोड दिली की आपल्याला सुखाचा व शांततेचा मार्ग सापडतो. त्यामुळे या घटनेच्या मुळाशी जायला आपण शिकून घेयला हवे.
आपल्या आजूबाजूला असणार्या अनेक व्यक्तींचा संबध आपल्याशी येत असतो अगदी घरदार पासून ते कामाच्या ठिकाणा पर्यन्त. या व्यक्तींसोबत आपले बर्याच वेळा वाद व विवाद होत असतात. बर्याच वेळा तो बदलेल याची आपण वाट पाहत राहतो आणि इथेच चुकतो. त्यामुळे समोरचा व्यक्ति आपल्या सोबत संपूर्ण आयुष्यभर असाच वागणार आहे, ही खूणगाठ मनाशी पक्की केली की आपल्या विचार प्रक्रियेत बदल होण्यास सुरुवात होते. विचार प्रक्रियेत बदल झाला की आपल्या मनाला होणारा त्रास कमी कमी होवू लागतो. हे असे का घडते कारण आपण अपेक्षा व वस्तुस्थिती यातील अंतर किंवा गॅप कमी केलेला असतो.
यांनी असच वागल पाहिजे ! यांनी तसच वागल पाहिजे ! ही आपली मागणी तशी वास्तवकतेशी मेळ घालणारी नसते. पुढच्याने आपल्याशी व दुसर्यांशी कसे वागावे हे ठरवणारे आपण कोण? आणि त्यामुळे आपण आपल्या दृष्टीकोनात व वागण्यात बदल करणे अपेक्षित असते. भूतकाळ काय व कसा होता याला तसा खूप अर्थ नसतो आणि भविष्यकाळातील परिस्थिति विषयी मनात इमले बांधणे हे वास्तववादी नसते. त्यामुळे वर्तमान काळ हाच आपले भाग्य, प्रारब्ध व नशीब असते हे लक्षात घ्यावे. माझा वाईट काळ लवकरच संपणार आहे, मला चांगले दिवस येणार आहेत आणि माझे भाग्य उजळणार आहे हे सर्व भविष्यकाळातील संदर्भ असले तरी वर्तमान काळातील आपली कामगिरी कशी आहे यावर हे संदर्भ अवलंबून असतात. जर हे संदर्भ तुम्ही काळावर सोडून देत असाल तर तुमची फसगत होणार हे नियतीने अगोदरच ठरवलेले असते.
अनेक वेळा आपण दुसर्याला दोष देवून मोकळे होत असतो. म्हणजे आपले अपयश किंवा आपली चूक ही आपली नसून दुसर्याची कशी आहे हे आपल्या स्वताला व इतरांना आपण पटवून देण्यात माहिर असतो. वास्तविक त्यामुळे आपले उदीष्टे व ध्येय गाठण्यात आपल्याला विलंब होत असतो हे आपल्या लक्षात घेत नाही. वाद विवाद झाले की समोरच्यानेच यावर माघार घ्यावी किंवा तोडगा काढावा अशी सर्वसाधारण अपेक्षा आपली असते आणि आपणही याबाबत पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे विनाकारण वैयक्तिक व अंतरवैयक्तिक संबध ताणले जातात व कटुता निर्माण होते. यामुळे नुकसान वैयक्तिक पातळीवर होतेच पण संस्थात्मक पातळीवर सुद्धा मोठे नुकसान होते. या मुळे वाद विवाद कमी करण्यात आपणहून पुढाकार घेण्यास हवा व आपली मानसिकता त्या प्रमाणे बदलायला हवी.
असे अनेक बदल ,घटना , बाबी इत्यादि आपल्या आयुष्यात पदोपदी येतात किंवा येतील या वेळी पुढाकार घेणे, नाते संबध जपणे, वाद विवाद मध्ये तोडगा काढणे, कधी कधी कमी मान घेणे अथवा माघार घेणे ,सकारत्मकता दाखवणे, अपेक्षा व वस्तुस्थिती यातील अंतर कमी करणे आणि वर्तमानकाळात जगने हे आपले आयुष्य आनंदी , सुखी, सोपे, सरळ आणि सुटसुटीतपणे जगण्यासाठी आवश्यक ठरते.
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई
9970246417