सकारात्मक व कर्तव्यतत्पर असे श्री. शिवाजी जोंधळे सर , सचिव, सामान्य प्रशासन (सामाजिक विकास समन्वय)मंत्रालय ,मुंबई

सकारात्मक व कर्तव्यतत्पर असे श्री. शिवाजी जोंधळे सर , सचिव, सामान्य प्रशासन (सामाजिक विकास समन्वय)मंत्रालय ,मुंबई या पदावरून आज नियत वयोमानानुसार शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.आज दिनांक ३१.०७.२०२० रोजी मला त्यांच्या मंत्रालयीन दालनात त्यांना भेटता आले व त्यांना शुभेच्छा देता आल्या. विशेष म्हणजे सर आज अगदी सांयकाळी सहा वाजेपर्यंत सुद्धा कामात व्यस्त होते आणि त्यामुळे त्यांच्या पेक्षा मलाच जास्त भरून आले .
श्री.शिवाजी जोंधळे सर यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून १९८७ साली शासकीय सेवेत प्रवेश केला .प्रथम अमळनेर प्रांत, नंतर निफाड प्रांत व त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी नाशिक,म्हणून कामकाज केले. त्यांनी मंत्रालयात मंत्री आस्थापनेवर खाजगी सचिव म्हणून काम केले.त्या नंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी झाल्यावर कोकण विभागात उपायुक्त महसूल म्हणून काम केले तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी यूएलसी म्हणून कामकाज केले. तसेच त्यांनी नवी दिल्ली येथेही केंद्रीय मंत्री यांच्याकडेही विशेष कार्य अधिकारी म्हणून कामकाज केले.भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती ने निवड झाल्यावर त्यांनी सिडको येथे काम केले. नागपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज केले.त्या नंतर त्यांची जिल्हाधिकारी जालना म्हणून पदस्थापणा झाली.
*जिल्हाधिकारी जालना म्हणून त्यांचे सोबत काम करत असताना त्यांचे कामकाजाला शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे.*
शासन धोरण, योजना व कार्यक्रम आखत असते. मात्र सदर धोरण, योजना व कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी क्षेत्रीय स्तरावर करत असतात. जिल्हा स्तरावर योजना राबविताना जिल्हाधिकारी हा केंद्रबिंदू असतो व त्याच्या नियंत्रणाखालीच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काम करत असते .
जालना जिल्हयात २ वर्षांमध्ये अगदी सहजतेने कार्यरत असलेले व तेवढेच कार्यकुशल व कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
जालना जिल्हा हा औरंगाबाद या ऐतीहासीक शहराला लागून असलेला, मात्र मानवी विकास निर्देशांकात अगदी खालच्या स्तरावर असलेला जिल्हा. जालना जिल्हयाची धुरा जिल्हाधिकारी म्हणून शिवाजी जोंधळे सरांनी स्वीकारल्या नंतर त्यांनी त्यांनी कामकाजाला गती दिली.अत्यंत शांत व मनमिळावू स्वभाव व तेवढीच प्रशासकीय कर्तव्यपारायनता व कार्यकुशलता यामुळे ते कमी कालावधीमध्येच लोकप्रीय झाले. रोज सकाळी १०.०० वाजता कार्यालयामध्ये येणे, संचिकांचा निपटारा करणे व कोणतीही जाहीरातबाजी न करता झिरो पेंडंसीकडे त्यांनी केलेली वाटचाल संस्मरणीय होती. कार्यालयीन वेळ संपल्यानंतरसुध्दा ते जाणीवपुर्वक कार्यालयामध्ये थांबत असत. या वेळेमध्ये शासनाकडील विवीध धोरणांचा व कार्यक्रमांचा अभ्यास करणे व सदर कार्यक्रम जिल्हयामध्ये कशा प्रकारे राबविण्यात येवू शकतील याबाबत ते विचार मंथन करीत असत. या वेळेत ते टेक्नोसेवी कामकाज सुद्धा करत असत. शासनाकडील ई-मेल, शासन निर्णय व परिपत्रके यांचासुध्दा त्यांचा दांडगा अभ्यास होता . आढावा बैठका घेणे व अधिका-यांना मार्गदर्शन करणे व एवढा कामाचा व्याप सांभाळून सामाजिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम यात सहभागी ते जाणीवपूर्वक होत असत, यातून त्यांचा मोठेपणाची व कार्यकर्तुत्वाची साक्ष मिळते. विकासाच्या प्रक्रियेत सामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू आहे याची त्यांना जाण होती. म्हणूनच येणा-या अभ्यांगतांची आदराने ते विचारपूस करत व त्यांच्या समस्यांची सोडवणूक करत असत. शासनाच्या योजना व कार्यक्रम प्रभावी पध्दतीने क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात त्यांचा हातखंडा होता.
समृध्दी महामार्गासाठी खाजगी वाटाघाटीने जमीन खरेदी करणे बाबत केलेले कामकाज त्यांनी पार पाडले. जवळपास २५ गावात ४३४ हेक्टर पैकी २८५ क्षेत्र खाजगी वाटाघाटी द्वारे संपादित केले याची टक्केवारी जवळपास ६६ टक्के येते . शासनाच्या विवीध भूसंपादन प्रकरणात खाजगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्याबाबतची कार्यवाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. ३९ प्रकरणात १३९ हेक्टर जमिनीचे संपादन खाजगी सरळ खरेदीने करण्यात आले .यात जिल्हाधिकारी यांनी समितीचे अध्यक्ष म्हणून खूप सकारात्मक काम केले .प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणीत तर देशपातळीवरील जालना जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला व जिल्हाधिकारी यांचा यथोचित असा सत्कार आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केला . डिजीटल इंडीयाच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यात डीजी धन मेळावा घेण्यात आला जिल्ह्यात सध्या २००० पॉस बसवण्यात आल्या . प्रधानमंत्री ग्राम आवास योजनेची अंमलबजावणी असो कि प्रधानमंत्री ग्रामस्वच्छता अभियान असो जिल्हा अग्रेसर ठेवण्याकडे त्यांचा कटाक्ष होता .
जिल्ह्यातील दोन महत्वाकांशी योजना जालना सिड पार्क व जालना ड्राय पोर्ट यासाठी भूसंपादन करणे जिकरीचे व तेवढेच आव्हानात्मक काम होते जोंधळे सरांनी सिड पार्क साठी ३० हेक्टर जमीन संपादित केली. तसेच ड्राय पोर्ट रस्त्या साठी खाजगी जमीन संपादन तर केलीच त्याच बरोबर गायरान जमीन उपलब्ध करून दिली . सार्वजनिक वितरण व्यवस्था जिल्ह्यात कार्यक्षम पणे राबवण्यात आली सद्यस्थितीत ७५ टक्के कार्ड धारकांना आधार पडताळणी द्वारे धान्य वाटप होत आहे . त्यांच्याच कार्यकाळातच जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत द्वारपोच व थेट वाहतूक सुरु करण्यात आली .उज्वला गस योजनेत १०० रुपयात गरीब व्यक्तीला गस देण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे . या योजनेत दोन वर्षापूर्वी फक्त ५००० जोडण्या होत्या सद्या जिल्ह्यात ४२००० जोडण्या देण्यात आल्या आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बाबत महिला व बालविकास अधिकारी यांचे समवेत अनेक कार्यक्रम आखण्यात आले त्याचीच फलनिष्पती म्हणून जिल्ह्यातील गुंणोत्तर मध्ये चांगली वाढ झाली.उसतोड कामगारांच्या मुलांसाठी विशेष सहाय योजना जिल्ह्यात राबवण्यात आली त्यामुळे पालकासोबत होणारे मुलांचे स्थलांतर थांबवता येवू शकले .
जलयुक्त शिवार योजना व मागील त्याला शेततळे योजना राबवतानी लोकसहभाग खूप महत्वाचा असतो साहजिकच जिल्ह्यात लोकसहभाग व अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर कामे होवू शकली .विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा २०१७ भरवण्याचा मान दहा वर्षांनतर प्रथमच जिल्ह्याला मिळाला या स्पर्धाचे नियोजन यशस्वी रित्या पार पाडण्यात आल्या . जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूका त्यांच्या कार्यकाळात शांतातामय वातावरणात पार पाडण्यात आल्या .ero net संकेत स्थळ व्दारे मतदार नोंदणी मध्ये सुद्धा जिल्ह्याने आघाडी घेतली. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प हा जिल्ह्यातील दुर्बल घटकांसाठी काम करणारा प्रकल्प जिल्ह्यात योग्य प्रकारे राबवण्यात आला .मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पासाठी जालना जिल्ह्यात एकूण ८२ गावामध्ये तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यात आली .सिरसवाडी येथे २०० एकर जमीन रसायन व तंत्र शिक्षण साठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु केली. तसेच जिल्ह्यात ई फेरफार योजना ९५३ गावांत प्रत्यक्ष त्यांच्या काळातच सुरु झाली . राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात त्यांनी अग्रेसर पणा दाखवला त्यामुळे निश्चितच अधिकार अभिलेख व भूमी अभिलेख यांचे संगणिकरणाचा टप्पा जिल्हा गाठू शकला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन शिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही याची त्यांना जाणीव होती. सरासरी ७५० मी मी प्रजन्य असलेल्या या प्रदेशात या अभियानातून जलव्यवस्थापन व मृदा संधारण करता येऊ शकेल याची जाणीव त्यांना होती. जिल्हा स्तरावरून त्यांनी व्यापक प्रयत्न करून व विविध कार्यालयातील विविध योजनांचा convergence साधून कामे पूर्ण करून घेतली.निश्चितच त्यामुळे ऐन दुष्काळात संरक्षित साठे उपलब्ध होऊ शकले.
अशा या अत्यंत अभ्यासू व सकारात्मक व्यक्तिमत्वाने महाराष्ट्र महसूल सेवा व भारतीय प्रशासकीय सेवा यामध्ये आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला.समाजातील तळागाळातीळ समाज माणसाविषयी उत्कट प्रेम असलेले,तितकेच अभ्यासू असे हे व्यक्तिमत्व.जिल्ह्यात काम करत असतांना या व्यक्तिमत्वा सोबत काम करण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना जे अनुभव मिळाले व जे शिकायला मिळाले तसेच त्याच्या स्वभावाचे विविध पैलू पाहावयास मिळाले ते शब्दबद्ध करण्याचं प्रयत्न मी केला आहे.जालना जिल्हा काम करायला तेवढाच खडतर व परीक्षा पाहणारा होता. राज्यातील नेहमीच्या प्रश्नापैकी काही वेगळे व मुलभूत प्रश्न त्यांच्या समोर होते.त्यांना हे माहित होते की एवढी मोठी शक्ती त्यांच्याकडे आहे.त्यासाठी त्यांनी या यंत्रणेचे प्रशिक्षणातून क्षमता वृद्धी करता येईल यावर भर दिला ते नेहमी सांगत कि आपण सर्व शासन व्यवस्थेचे संरक्षक आहोत आणि त्यामुळे आपल्या सर्वांची भूमिका ही सामान्य माणूस ,शेतकरी,शेतमजूर याच्या उत्कर्षासाठी असली पाहिजे. शासनाकडून आलेलं दुष्काळी अनुदान शेतकरी खात्यावर जमा करणे बाबत नियोजन करणे व तत्परतेने ते बाधित शेतकरी यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक होते,प्राप्त झालेले हे अनुदान अगदी कमी वेळात त्यांनी अचूक नियोजन करून आपल्या प्रशाकीय यंत्रने मार्फत जमा केले. पाणी टंचाई समस्या दुष्काळात उग्र रूप धारण करते ,त्यामुळे टँकर व विहीर अधिग्रहण सुविधा देणे व त्यासोबत जिल्हा पातळीवरून त्याचे पर्यवेक्षण करणे अत्यावश्यक ठरते याबाबतीत त्यांनी दुःकाळातील शेवटचा व्यक्ती नव्हे तर टँकर ने पाळीव जनावरांना सुद्धा पाणी पोहचले जाईल याबत दक्षता घेतली.गरज पडली तर ते अगदी मंडळ अधिकारी यांचे पर्यंत सवांद साधत त्यामुळे क्षेत्रीय स्तरावरील अडचणी ते अचूक शोधून त्यावर सकारात्मक उपाय योजना ते सांगत असत. भूसंपादन सारख्या किचकट विषयाचा त्यांना गाढा अभ्यास असल्यामुळे त्यांनी विभागातील विविध कार्यालयाचा योग्य समन्वय साधून जवळपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन पूर्ण करण्यात येऊन मावेजा भूधारकाना मिळवून दिला. जालना जिल्ह्यातील शेतीच्या समस्या व त्यामुळे प्रदेशातील अर्थकारणावर होणारे त्याचे दूरगामी परिणाम या बाबत त्यांना कृषी पदवीधर म्हणून काम केल्याने प्रचिती होती. मंत्रालयात ते जिल्ह्याच्या प्रश्नाबाबत ते चोख बाजू मांडत व उपाययोजना सुचवत व त्यांची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करत . जोंधळे सरांनी जालना जिल्हाधिकारी पदावर काम केल्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकारी ही मोठी जबाबदारी सांभाळली .जिल्हाधिकारी मुंबई शहर म्हणून काम करताना त्यांनी लीज नूतनीकरण बाबत विशेष मोहीम राबवली व शासनास मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून दिला . नुकतीच काही महिन्यांपूर्वी त्यांची पदोन्नतीने मंत्रालय मुंबई येथे सचिव ,सामान्य प्रशासन (सामाजिक विकास समन्वय) येथे नियुक्ती झाली . १९८७ साली उपजिल्हाधिकारी ते २०२० साली सचिव सामान्य प्रशासन हा जवळपास ३३ वर्षाचा प्रशासकीय प्रवास आमच्या सारख्या अधिकार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. जोंधळे सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
*राजीव नंदकर*
उपजिल्हाधिकारी ,मुंबई,
९९७०२४६४१७