तुमच्या मनाची लाईट जावून देवू नका !
तुमच्या मनाची लाईट जावून देवू नका !
आपल्याला नैराश्य (Depression), खिन्नता(Sadness) आणि नकारत्मक्ता(Negativity) का आवडते? याचे उत्तर सोपे आहे कारण या अवस्थेत आपल्या मेंदूला व शरीराला कोणतीही उर्जा खर्च करावी लागत नाही. त्यानुसार तुमचे अचेतन मन (Unconscious Mind)तुम्हाला नैराश्य, खिन्नता आणि नकारत्मक्तेच्या बंदिगृहात नेहमी बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत असते. असे असले तरीही सर्वांचेच चेतन मन(Conscious Mind ) यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते मात्र हे फक्त काहींनाच शक्य होते.
आपला मेंदू व शरीर यांना हि अवस्था आवडत असल्याने ते जाणीवपूर्वक तुम्हाला या स्थितीतून बाहेर काढू इच्छित नाही. आपली कृती व कार्य हे आपल्या शरीराची उर्जा ज्याला आपण कॅलरी म्हणतो ते खर्च करत असते आणि हे आपल्या मेंदूला व शरीराला नको असते. त्यामुळे अचेतन मन व चेतन मन यांच्यात तसेच आपले शरीर व मेंदू यांच्यात कायम संघर्ष चालू असतो. म्हणजे यात एक रेस अथवा त्याला स्पर्धा म्हणू ते चालू असते. विशेष म्हणजे हि स्पर्धा पुढे जायची नसते तर मागे राहण्याची असते. हि लढाई जिंकण्याची नसते तर हरण्याची असते. हि लढाई सुरुवात शक्यतो आपण निद्रिस्त अवस्थेतून सकाळी बाहेर पडतो त्यावेळेस सुरु झालेली आपल्याला पहावयास मिळते .
लहान असताना लाईट गेली कि आपल्याला खूप आनंद होत असे कारण त्या मुळे आपल्याला अभ्यासाच्या कष्टसाध्य कामातून विना मागणी सूट मिळत असे. नैराश्य, खिन्नता आणि नकारत्मक्ता यांचेही असेच आहे. आपल्या मनाची लाईट गेली कि आपला मेंदू व शरीर याला कार्य व कृतीमधून सूट मिळते त्या मुळे हे त्यासाठी सदैव तत्पर असतात. त्या मुळे हि लाईट घालवून दयायची कि आपले मन प्रकाशमान ठेवायचे हे आपल्या हातात असते. या साठी जाणीव पूर्वक आपण प्रयत्न करायला हवेत. तसे पहिले तर कष्टाचे काम काम करणारे व हतावर पोट असणारे यांच्या मनाची लाईट सहजा जात नाही कारण त्यांनी लाईट घालवली तर त्यांना जगण्याची भ्रांत पडेल. हि लाईट फक्त अशाच लोकांची जाते ज्यांच्याकडे खाण्याची भ्रांत नसते, जे दुसऱ्यावर अवलंबून असतात आणि ज्यांची लाइफ काही प्रमाणात आर्थिक दृष्ट्या सेट झालेली असते .
हि लढाई आपल्याला जिंकायची असेल तर आपण सकाळी झोपेतून उठल्या नंतर निर्गुण व निरंकार अशा सर्व शक्तिमान भगवंताचे नामस्मरण करायला हवे, कीर्तन व भजन ऐकण्याची सवय लावून घ्यावी, पूजा अर्चा यासाठी काही वेळ सकाळी व सांयकाळी दयायला हवा , शारीरिक व्यायाम करणे , योग करणे , ध्यानधारणा करणे या मुळेही तुम्ही सकारात्मक होत असता, संगीत ऐकने हा सुद्धा योग्य उपाय आहे. या मुळे काय होते तर आपण नैराश्य, खिन्नता आणि नकारत्मक्ता जी आपल्या मेंदूला व शरीराला आवडते त्यातून बाहेर पडण्यास मदत होते आणि आपण एक नवी उर्जा घेवून नव्या दिवसाची सुरुवात करतो. साहजिकच तुमच्या मनाची लाईट जावू देवू नका आणि सोपे, सहज, सुटसुटीत ,सुखी आयुष्य जगा, कि जे अनमोल आहे.
१/१०१ (दि. ११.०२.२०२० )
राजीव नंदकर उपजिल्हाधिकारी मुंबई ,
९९७०२४६४१७